भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याकडे जगाच्या नजरा क्रिकेटकडे लागल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, तमिळ अभिनेत्री रेखा बोजने असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

रेखा बोजने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून भारत जिंकल्यास ती कपड्यांशिवाय बीचवर धावणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले- जर भारताने हा विश्वचषक जिंकला तर मी विझाग बीचवर कपड्यांशिवाय धावेन. ऑल द बेस्ट टीम इंडिया.

सोशल मीडियावर लोक तिच्या या पोस्टवरून तिला ट्रोल करत आहेत. कमेंट करताना लोकांनी लिहिले - तुला लाज वाटली पाहिजे. काही यूजर्सनी लिहिले आहे कि - २०११ मध्ये पूनम पांडेने असे सांगितले होते कारण हे एक प्रमोशन आहे. २०११ मध्ये पूनम पांडेनेही असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ती चांगलीच लोकप्रिय झाली होती.

तमिळ अभिनेत्री रेखाने १५ नोव्हेंबरला ही पोस्ट केली होती. मात्र दोन दिवसांनी तिची पोस्ट चर्चेमध्ये आली. रेखाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने मांगल्यम, स्वाती चिनुकू, रंगीला, कालाया तस्माया या चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र रेखाला अद्याप म्हणावे तितके यश मिळालेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now