भारतीय टीम आणि चाहत्यांच्या पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला नसला तरी त्यांनी संपूर्ण टूर्नामेंटमध्ये अद्वितीय कामगिरी करून चाहत्यांची माने जिंकली.

अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर देखील चाहते टीम इंडियाच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये संघाने मैदानावर सर्वांचेच मन जिंकले, पण म्हत्वाचे म्हणजे बेस्ट फिल्डर मेडल कोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असायची. आता फायनलच्या सामन्यामध्ये कोणता खेळाडू बेस्ट ठरला याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

भारताने अथक प्रयत्न करून देखील सामना जिंकता आला नाही यामुळे सर्वच खेळाडू प्रचंड निराश झालेले दिसले. मोहम्मद सिराज, विराट कोहली आणि रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. ड्रेसिंग रूममध्ये भयाण शांतता दिसली. सर्व खेळाडू हताश, निराश होऊन बसलेले दिसले. पण भारताच्या फिल्डिंग कोचने संघाच्या कामगिरीचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

व्हिडीओमध्ये पहिल्या बेस्ट फिल्डर अवॉर्डपासूनचे ते शेवटपर्यंतच्या अवॉर्डपर्यंतचे क्षण दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर फायनल सामन्यामधील बेस्ट फिल्डरची घोषणा करण्यात आली. विराट कोहलीला पहिल्या सामन्यामध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जिंकला होता तर शेवटच्या सामन्यामधील बेस्ट फिल्डरचे मेडल देखील त्यालाच मिळाले.

कोच टी दिलीप यांनी विराटच्या मैदानावरील कामगिरीचे कौतुक करत रविद्र जडेजाच्या हातून त्याला मेडल देण्यात आले. कायम जल्लोषामध्ये पार पडणाऱ्या बेस्ट फिल्डर सेरेमनीमध्ये यावेळी भयाण शांतता होती. बेस्ट फिल्डर सेरेमनीनंतर संघाचे फिल्डींग कोच टी. दिलीप यांनी सर्व भारतीय चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खूप खूप आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post