रश्मिका मंदाना आणि कॅटरीना कैफनंतर काजोल डीपफेक व्हिडीओची शिकार बनली आहे. हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे असली आणि नकलीमधील फरक नाहीसा होतो. गेल्या महिन्यामध्ये अनेक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये काजोलचा देखील एक व्हिडीओ आहे जो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.


रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओच्या वादादरम्यान, काजोलचा एक एडिटेड व्हिडीओ समोर आला आहे. असली क्लिपमध्ये इंफ्लूएंसर रोसी ब्रीन आहे जिने टिकटॉकवर हा व्हिडीओ शेयर केला होता. व्हिडीओमध्ये डीपफेक टेक्नोलॉजीच्या मदतीने इंफ्लूएंसरच्या चेहऱ्याला काजोलच्या चेहऱ्याने बदलण्यात आले. व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटते कि अभिनेत्री खरंच कॅमेऱ्यासमोर कपडे बदलत आहे.


व्हिडीओमध्ये काजोलच्या चेहऱ्यासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामध्ये खऱ्या महिलेचा चेहरा क्षणभरच दिसत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे शक्य झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूळ व्हिडिओ 'गेट रेडी विथ मी' या ट्रेंडसह ५ जून रोजी TikTok वर शेअर करण्यात आला होता.


रश्मिका मंदाना आणि कॅटरीना कैफचा बनावट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि कीर्ती सुरेश सारख्या सेलेब्ससोबत सामान्य लोकांनी डीपफेकबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नुकतेच डीपफेक व्हिडीओ भारतासाठी मोठा धोका असल्याचे सांगितले होते. त्यांनी मिडियाला डीपफेकबद्दल लोकांना शिक्षित करण्याची विनंती केली. पीएम मोदींनी सांगितले की त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये ते गरबा करताना दिसत होते, जे खरे दिसत होते.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now