२ वर्षाचा मुलगा बनला मास्टर गुगल, प्रश्न पूर्ण व्हायच्या अगोदरच देतो उत्तर: सोशल मिडियाच्या माध्यमातून अशा बातम्या आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळतात ज्या पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आपल्या भुवया आश्चर्याने उंचावतात.

असे देखील होते होऊ शकते का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. आत्ताच्या काळातील मुले खूपच जास्त स्मार्ट होऊ लागली आहेत. प्रतिस्पर्धीच्या या युगामध्ये प्रत्येकजण हा एकमेकांच्या पुढे जाण्याचा विचार करत आहेत. सध्या सोशल मिडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक देखील आश्चर्यचकित होत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ झारखंडचा असल्याचे समजत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असलेल्या मुलाचे वय अवघे १.३० वर्षे आहे. ज्या वयामध्ये एखादे मुल नीट चालत देखील नाही, बोलू शकत नाही असा हा मुलगा आहे.

या मुलाला कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, तथा कोणत्याही फलाविषयी किंवा भाजीविषयी, राजधानीविषयी विचारले असतात काही सेकंदामध्ये त्याचे उत्तर देतो. पत्रकाराने त्याच्या आईला विचारले याला इतकी माहिती कुठून आणि कशी मिळाली. तुम्ही याचा अभ्यास घेता का?

यावर उत्तर देताना त्याची आई म्हणाली खेळता खेळता त्याने हे सर्व शिकले आहे आणि अजून देखील शिकत आहे. अवघ्या दीड वर्षामध्ये त्याला इतकी माहिती असल्यामुळे त्याला गुगल बॉय म्हणून ओळखले जात आहे.

या जबरदस्त मुलाचा व्हिडीओ सोशल मिडिया Principle of News या युट्युब चॅनेलवरून शेयर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळ जवळ ३.५ लाख लोकांनी पाहिला आहे तर ५.७ हजार लोकांनी याला लाईक केले आहे.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now