यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन या त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या T२० सामन्यामध्ये अनोखा विक्रम नोंदवला. तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात या तिन्ही फलंदाजांनी ५० धावांचा आकडा पार केला. भारतीय T२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या तीन फलंदाजांनी ५० धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजपर्यंत टॉप 3 फलंदाज भारतासाठी हे करू शकले नव्हते. जागतिक क्रिकेटमधील ही केवळ ५वी घटना आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांबद्दल बोलायचे झाल्यास, या यादीत सामील होणारा भारत हा दुसरा देश आहे.

टॉस हरल्यानंतर पाहिलांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला यशस्वी जयस्वाल आणि  ऋतुराज गायकवाड या जोडीने तुफानी सुरुवात करून देत ५.५ ओवरमध्ये ७७ धावा जोडल्या. यशस्वी ने २५ चेंडूमध्ये ९ चौकार आणि २ षटकार मारत ५३ धावांची खेळी केली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ईशान किशनने धावांची गती कमी होऊ न देता ३२ चेंडूमध्ये ३ चौकार आणि ४ षटकार मारत ५२ धावा बनवल्या. तर गायकवाडने शेवटच्या ओवरमध्ये आउट होण्यापूर्वी ५८ धावा बनवल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने २३५ धावांपर्यंत मजल मारली.

T20 इंटरनॅशनलमध्ये टॉप – ३ खेळाडूंद्वारा अर्धशतक बनवणारे संघ

ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, एडिलेड, २०१९

बरमूडा विरुद्ध बहामास, कूलिज, २०२१

कनाडा विरुद्ध पनामा, कूलिज, २०२१

बेल्जियम विरुद्ध माल्टा, जेंट, २०२२

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, २०२३

या विशाल धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवर प्लेमध्येच, कांगारूंनी तीन विकेट गमावल्या, ज्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश होता, ज्यामध्ये गेल्या सामन्यातील शतकवीर जोश इंग्लिशची विकेट देखील होती. मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टोइनिस आणि टिम डेविड शानदार फलंदाजी केली, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

कर्णधार मॅथ्यू वेडने शेवटपर्यंत झुंज दिली, पण ऑस्ट्रेलियाला निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९१ धावाच करता आल्या. २३ चेंडूत ४२ धावा केल्यानंतर वेड नाबाद राहिला. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. यशस्वीला त्याच्या झंझावाती खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now