महेंद्रसिंग धोनीने ३ वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. एमएस धोनी कुठेहि गेला तरी चाहते त्याला फॉलो करतात. कुणाला त्याचा ऑटोग्राफ हातावर हवा असतो, कुणाला कागदावर, कुणाला फोनच्या मागच्या बाजूला, कुणाला डायरीत, कुणाला टी-शर्टवर, कुणाला गाडीवर तर कुणाला गाडीच्या सीटवर. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल हॉट आहे, ज्यामध्ये एमएस धोनी आधी त्याच्या एका चाहत्याची बाईक स्वतःच्या टी-शर्टने साफ करतो आणि नंतर त्यावर ऑटोग्राफ देतो.

एमएस धोनी हा रांचीच्या जेएससीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये वारंवार येत असतो. याच मैदानावर तो नेहमी सराव करतो आणि येथे तो बॅडमिंटन, टेनिससारखे खेळ खेळतो. एक एक मोठी जिम देखील आहे, जिथे धोनी अनेकवेळा जातो आणि यादरम्यान चाहते देखील तिथे पोहोचतात. असाच एक चाहता त्याची सुपर बाईक घेऊन धोनीजवळ पोहोचला आणि त्याने ऑटोग्राफ मागितली. धोनीने त्याला निराश केले नाही. त्याने आपल्या  टीशर्टनेने बाईक साफ केली आणि नंतर ऑटोग्राफ दिला. धोनीने बाईक थोडी चालवून देखील बघितली.

प्रत्येकाला माहिती आहे कि एमएस धोनीला बाईक खूप आवडते. त्याने आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील बाईक देखील सांभाळून ठेवली आहे. चाहत्याची हि बाईक ट्राइंफ रॉकेट 3आर आहे. याचे इंजिन २४५८ सीसीचे आहे. आज भारतात याच्यापेक्षा देखील लहान इंजिन असलेल्या शेकडो कार आहेत. या सुपर बाईकची किंमत २०-२१ लाख रुपये आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now