भारतामध्ये हि रीत अनेक वर्षांपासून चालत आली आहे कि एका मुलीचे जेव्हा लग्न होते तेव्हा ती आपल्या सासरी निघून जाते. तेव्हा सासू सासरेच तिचे आईवडील होतात आणि तिचा पती तिचे सर्वकाही होऊन जातो. कारण लग्नानंतर तिचा पतीच एक अशी व्यक्ती असते ज्याच्यासोबत सुखदुख सर्वकाही शेयर करू शकते.

अशामध्ये एका पती-पत्नीचे प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये त्या महिलेच्या पतीने मरण्यापूर्वी आपल्या प्रेमाची अनोखी निशाणी पत्नीला दिली. यामध्ये असे सांगितले जात आहे कि गुजरातच्या एका तरुणीचे कॅनडामध्ये लग्न झाले होते.

लग्न झाल्यानंतर ४ महिन्यानंतर त्यांना बातमी मिळाली कि गुजरातमध्ये तिच्या सासऱ्याची हृदयविकाराच्या झटक्यामुळे तब्येत बिघडली आहे. ज्यानंतर तिला पतीसोबत पुन्हा परत वडोदराला परतावे लागले. पण भारतामध्ये येताच तिचा पती को’रो’ना’चा बळी ठरला.

ज्यानंतर तिच्या पतीची तब्येत देखील खूपच नाजूक झाली. त्या महिलेच्या पतीला दोन महिने एका खाजगी रूग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. डॉक्टर म्हणाले कि तब्येत खूपच नाजूक झाली आहे तो ४८ तासापेक्षा जास्त वेळ जगू शकत नाही. यावर पतीला गमावण्याच्या भीतीने त्या महिलेने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली.

वास्तविक एक महिला लग्नानंतर एक सुखद जीवन जगण्याचे आणि कुटुंबाला पुढे नेण्याचे स्वप्न पाहते. पण तिच्या नशिबामध्ये असे नव्हते. यानंतर त्या महिलेने उच्च न्यायालयात विनंती केली कि मला माझ्या पतीचे स्प’र्म मिळावेत. जेणेकरून मी त्याच्या मुलाला जन्म देऊ शकेन. पण याला वैद्यकीय कायद्याने परवानगी दिली नाही.

बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी जेव्हा उच्च न्यायालयाने त्या महिलेचे सर्व म्हणणे ऐकून घेतले तेव्हा कुठे पुढची कारवाई सुरु झाली आणि १५ मिनिटामध्ये फोनवर रुग्णालयाला आईवीएफ प्रोसिजर करण्याचा आदेश दिला गेला. आजच्या इतिहासामध्ये पहिलांदाचा असे झाले आहे कि जेव्हा उच्च न्यायालयाने सुनावणी थांबवून एका पतीसाठी तळमळणाऱ्या पत्नीचे म्हणणे ऐकून घेतले. पत्नीने आपल्या पतीच्या अंतिम क्षणी त्याच्या प्रेमाची निशाणी मिळवण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

Post a Comment

Previous Post Next Post