बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग सीजन पाहायला मिळत आहे. कॅटरीना-विकी, रणबीर-आलिया यांच्यानंतर आता आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. पण हे दोघे अॅक्टर नाहीत. खेळाडू आणि बॉलीवूड अभिनेत्री अशी हि जोडी आहे. अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिसपटू लियांडर पेस लग्न करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा समोर येत आहेत. दोघांच्या लग्नाची तयारी देखील जोरदार सुरु आहे. अशी माहिती समोर आली आहे कि टेनिसपटू लियांडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा यांनी आपली रिलेशनशिप ऑफिशिअल केली आहे. सध्या दोघे एकमेकांचे सुंदर फोटो शेयर करताना दिसत आहेत.

दोघांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या या नात्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे घरच्यांच्या संमतीने हि जोडी कोर्ट मॅरेज करणार आहे. लियांडर पेसचे आईवडील मुंबईमध्ये आले असून त्यांनी या दोघांची भेट घेतली. त्यानंतर ते किमच्या घरी गेले. लियांडर पेस आणि किम हे दोघे यापूर्वीच्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे बरेच चर्चेत राहिले आहेत.

किमचे नाव क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हर्षवर्धन राणेसोबत देखील जोडले गेले होते. या दोघांसोबत किमच्या अफेयरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. तर लियांडर पेस अनेक वर्षांपासून संजय दत्तची पूर्व पती रिया पिल्लईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दोघे बरीच वर्षे सोबत होते. दरम्यान रिया पिल्लईने लियांडर पेसवर घरगुती हिंसाचाराचा गंभीर गुन्हा देखील दाखल केला होता. यानंतर लियांडर पेस आणि किम शर्मा यांचे सुत जुळले.


लियांडर पेस आणि किम शर्मा यांचे नाते फार जुने नाही. दोघांनी मार्च महिन्यामध्ये त्यांच्या नात्याची पहिली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती. पहिल्या अॅनिव्हर्सरीनिमित्त किम आणि लियांडर यांनी एकमेकांचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले होते. दोघांनी आपले नाते ऑफिशियल केल्यानंतर देखील त्यांची बरीच चर्चा झाली होती. शिवाय दोघेही वयाच्या पन्नाशीमध्ये लग्न करत आहेत असेच म्हणावे लागेल. कारण लियांडर पेस ४८ वर्षांचा आहे आणि किम ४२ वर्षांची आहे. जर किम आणि लियांडरच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या असतील तर ते लवकरच आपल्या लग्नाची तारीख जाहीर करतील असे म्हंटले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post