टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची तब्बल दीड कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकणी आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. ऋषभ पंतची फसवणूक करणाऱ्याचे नाव मृणांक सिंग असे आहे.

मृणांक सिंगने ऋषभला महागडे घड्याळ आणि मोबाईल स्वस्तामध्ये मिळवून देतो असे सांगितले होते. याप्रकरणी ऋषभ पंतचा मॅनेजर पुनीत सोलंकी याने मृणांक सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चेक बाऊन्स होऊन ऋषभ पंतची १,६३,००,००० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

मृणांक सिंग हरियाणाचा क्रिकेटपटू आहे. न्यायालयाने मृणांकला हजर करण्याची नोटीस जारी केली आहे. मृणांकला या महिन्याच्याच सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर एका व्यावसायिकाची देखील सहा लाखाला फसवणूक केल्याचा आरोप देखील आहे.

ऋषभ पंतला महागड्या कंपनीचे घड्याळ घ्यायचे होते, त्याने एका घड्याळासाठी तब्बल ३६,२५,१२० रुपये आणि दुसऱ्या कंपनीच्या घड्याळासाठी तब्बल ६२,६०,००० लाख रुपये दिले होते.

ऋषभ पंतने तक्रारीमध्ये म्हंटले आहे कि मृणांक सिंगने त्याची फसवणूक केली आहे. २०२१ मध्ये मृणांकने मॅनेजर पुनीत सोलंकीला खोटे सांगितले होते कि त्याने महागडी घड्याळे आणि इतर वस्तू खरेदी आणि विक्री करण्याचा बिजनेस सुरु केला आहे.

मृणांकने अनेक खेळाडूंचा उल्लेख करून त्यांना महागड्या वस्तू विकल्याचा देखील आरोप आहे. ऋषभ पंतने २०२१ मध्ये त्याला काही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले. मृणांक बनावट कामे करून चित्रपट दिग्दर्शक आणि अनेक हॉटेल मालकांना फसवत असल्याचे देखील समोर आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post