कॉमेडी किंग महमूद यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी मुंबईत झाला होता. आपल्या खास शैली, हावभाव आणि उत्कृष्ट विनोदांनी लोकांना त्यांनी भारावून टाकले होते. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राला त्यांनी अजरामर केले, त्याला खास बनविले. महमूदचे याचे पूर्ण नाव महमूद अली होते. त्यांच्या आई-वडिलांच्या ते आठवे सुपुत्र होते. तसेच त्यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत होते.

अंडी विक्रीता ते टॅक्सी चालक

घरच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी महमूद यांनी फक्त अंडीच विकली नाहीत तर टॅक्सी चालिवण्याचे सुद्धा काम केले परंतु लहानपणापासूनच त्यांचा अभिनयाकडे कल होता. १९४३ मध्ये बॉम्बे टॉकीजच्या किस्मत चित्रपटामध्ये त्यांना पहिली संधी मिळाली. त्याचवेळी महमूद लाखो लोकां लोकप्रिय झाले. जगाला हसायला लावणाऱ्या महमूद यांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमार यांना टेबल टेनिस शिकवण्याचे देखील काम केले होते. टेनिस शिकवताना महमूद हे मीना कुमारीची बहीण मधुच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी आ त्म ह त्येची धमकी देऊन तिच्याशी लग्न सुद्धा केले.

टाळ्यांचा कडकडाट व्हायचा

त्या काळामध्ये ज्या अभिनेत्यासाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा त्यापैकी महमूद एक होते. जेव्हा शूटिंग संपायची तेव्हा त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. मेहमूद हे एकमेव कॉमेडियन होते ज्यांचे चित्रपटाच्या पोस्टरवर हिरोसोबत फोटो असायचे. चित्रपटगृहात लोक महमूदला पाहण्यासाठी तुफान गर्दी करायचे. वस्तुस्थिती अशी होती की चित्रपट हिट व्हायचा असेल तर महमूद असा एकमेव अभिनेता होता जो चित्रपटामध्ये असायला हवा हे दिग्दर्शकांला चांगलेच माहित होते.

कधीही केली नाही रिहर्सल

महमूदविषयी असे म्हंटले जायचे की त्यांना कधीच रिहर्सल करताना पाहिले गेले नाही. चित्रपटांमध्ये ते लाईव्ह करायचे, म्हणूनच बऱ्याच चित्रपटातील कलाकार त्यांच्यावर जळत असत. इतकेच नाही तर त्यांचा यावर देखील आक्षेप असायचा कि महमूद यांना हिरोपेक्षा जास्त पैसे मिळायचे. अनेक दशके आपल्या चित्रपटांद्वारे लोकांच्या मनावर राज्य करणारे महमूद यांनी जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now