९० च्या दशकामध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर दर्शकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. अभिनयासोबतच वर्षा उसगावकरने आपल्या सौंदर्याने दर्शकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. वयाची पन्नाशी पार केली असली तरी वर्षा उसगावकर अजूनही चिरतरुण दिसतात. सध्या त्या चित्रपटांपासून दूरच आहेत. पण मराठी तारका सारख्या शोमधून त्यांनी आपल्या नृत्याची आवड जोपासली आहे.

गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ यासारख्या चित्रपटांमधून वर्ष उसगावकर यांनी आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले. त्यांनी साकारलेल्या भूमिका दर्शकांना खूपच पसंत आल्या. मराठी फिल्म इंडस्ट्रीप्रमाणे वर्षा उसगावकर यांनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले. परवाने, तिरंगा, हस्ती, दूध का कर्ज, घर आया मेरा परदेसी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले पण मराठी फिल्म इंडस्ट्री प्रमाणे बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या जास्त सफल झाल्या नाहीत. आता पुन्हा एकदा वर्षा उसगावकर आपल्या भेटीला येणार आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असतं हि नवीन सिरीयल लवकरच सुरु होणार आहे ज्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर काम करताना पाहायला मिळणार आहेत. १० वर्षांपूर्वी त्यांनी स्टार प्रवाहवरील मन उधाण वाऱ्याचे सिरीयल मध्ये काम केले होते. सुख म्हणजे नक्की काय असतं हि नवीन सिरीयल स्टार प्रवाहवर प्रसारित होणार असून या सिरीयल मध्ये वर्षा उसगावकर नंदिनी या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. नंदिनीची भूमिका एक सोज्वळ आणि घरंदाज सासूची असणार आहे.

या सिरीयल विषयी सांगताना त्या म्हणाल्या कि, १० वर्षानंतर मी पुन्हा स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सच्या सिरीयलमध्ये काम करतेय. खूपच आनंद होतोय. सिरीयलमुळे आपण प्रत्येक घरामध्ये पोहोचतो आणि दर्शकांच्या आयुष्याचा एक भाग बनतो. म्हणून सिरीयलमध्ये काम करताना मला खूपच आनंद होतो. या सिरीयलमधील माझी भूमिका खूपच वेगळी असणार आहे. नंदिनी एक व्यावसायिक असून ती गृहोद्योग समुहाची प्रमुख आहे. त्याचबरोबर कोल्हापुरमधील शिर्के पाटील या प्रसिद्ध कुटुंबाचे ती प्रतिनिधीत्व करते. या सिरीयल मधील माझी नंदिनीची भूमिका दर्शकांना खूपच आवडेल.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now