९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्काने आपल्या काळामध्ये अनके हिट चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये खिलाडी, जो जीता वही सिकंदर, रंग, बलमा आणि वक्त हमारा है सारखे चित्रपट सामील आहेत. २८ जुलैला आयशा आपला वाढदिवस साजरा करते, अशामध्ये आज आपण तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

२८ जुलै १९७२ मध्ये जन्मलेल्या आयशा जुल्काचा जन्म श्रीनगरमध्ये झाला होता. आज ती चित्रपटांपासून दूर आहे पण बिजनेसमध्ये आपले नाव कमवत आहेत. तसे तर तिच्या फिल्मी करियरदरम्यान तिने नाव बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि नाना पाटेकर सोबत देखील जोडले गेले आहे.

आयशाने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात १९९० मध्ये नेति सिद्धार्थ या तेलगु चित्रपटामधून केली होती. यानंतर १९९१ मध्ये तिने कुर्बान चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. इतकेच नाही तर तिने तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

१९९२ मध्ये आमिर खानसोबत जो जीता वही सिकंदर चित्रपटामध्ये ती पाहायला मिळाली होती. या चित्रपटानंतर ती खूपच लोकप्रिय झाली आणि एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांशी तिचे नाव जोडले गेले.

१९९३ मध्ये दलाल या चित्रपटामध्ये ती मिथुन चक्रवर्तीसोबत पाहायला मिळाली होती. या चित्रपटाबद्दल खूपच वाद निर्माण झाले होते, असे म्हंटले जाते कि हा वाद कोर्टापर्यंत देखील पोहोचला होता. वास्तविक फिल्ममेकर पार्थ घोषने एक इं-टीमेट सीन दरम्यान आयशाच्या डुप्लीकेटचा वापर केला होता, तर अशा कोणत्याही सीनबद्दल आयशाला माहिती दिली गेली नव्हती. चित्रपट साईन करण्याअगोदर आयशाने डायरेक्टरला आधीच सांगितले होते कि ती कोणताही इं-टिमेट सीन करणार नाही.

चित्रपटासंबंधी हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला होता, पण या वादानंतर तिच्या करियरला उतरती कळा लागली. तिने आपल्या करियरमध्ये ५२ चित्रपटांमध्ये काम केले ज्यामधील बरेच चित्रपट सुपरहिट झाले. २०१८ मध्ये ती जीनियस चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती.

२००३ मध्ये तिने बिजनेसमॅन समीर वाशीसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने फिल्मी दुनियेचा निरोप घेतला आणि आपल्या पतीच्या बिजनेसमध्ये मदत करू लागली. आयशा सोशल मिडियापासून देखील दूरच राहते. इतकेच नाही तर ती मिडियाच्या समोर देखील कधी येत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now