UAE चा क्रिकेटर चिराग सूरीने एका मुलाखती दरम्यान शुभमन गिल आणि सारा तेंडूलकरबद्दल मोठा खुलासा केला आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. तथापि दोघांनी अद्यापहि यावर काहीही स्पष्ट केलेले नाही. विश्वचषकादरम्यान दोघांचे नाव खूपच चर्चेमध्ये राहिले.

दरम्यान शुभमन गिलचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे साराला डेट करत असल्याचे संकेत दिले होते. कारण शुभमनने हो देखील म्हटलं नाही आणि नाही देखील म्हटलं नाही. जेव्हा सोनम बाजवाने संवादादरम्यान शुभमनला विचारले की तू साराला डेट करत आहेस का, तेव्हा त्याने बहुधा असे उत्तर दिले.

शिवाय आणखी एक जुना व्हिडीओ खूपच व्हायरल होतोय, ज्यामध्ये यूएईचा क्रिकेटर चिराग सूरीने उघडपणे सारा तेंडुलकरचे नाव शुभमनसोबत जोडले होते. जेव्हा त्याला डेटिंग आणि लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने शुभमन गिलचे नाव घेतले. तो म्हणाला कि शुभमनची एक मैत्रीण आहे. नावाबद्दल विचारले असता त्याने शुभमनसोबत साराचे नाव घेतले.

या मुलाखतीनंतर शुभमनने चिरागला अनफॉलो केल्याचे बोलले जाते. सारा अली खानने देखील कॉफी विथ करण मध्ये देखील स्पष्ट केले होते कि ती शुभमनला डेट करत नाही, त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे कि शुभमनसोबत कोणते नाव जोडले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now