भारतामध्ये आयोजीत केलेल्या वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाचे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. तर आता टीम इंडिया २०२४ मध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या चँपियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीमध्ये आहे आणि या ट्रॉफीमध्ये २०२३ वर्ल्ड कपमध्ये खालेले फक्त ९ खेळाडू खेळताना दिसतील.

वर्ल्डकप २०२३ मध्ये खेळलेले 9 खेळाडू खेळताना पाहायला मिळू शकतात

आयसीसी चँपियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे आणि यादरम्यान एकूण ८ टीम खेळताना दिसणार आहेत. तर भारतीय टीमबद्दल बोलायचे झाले तर चँपियन्स ट्रॉफीसाठी वर्ल्डकप २०२३ मध्ये खेलेल्या १५ खेळाडूंपैकी फक्त 9 खेळाडू या ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतात.


चँपियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसेल अशी अपेक्षा आहे. शिवाय विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू देखील संघात खेळताना दिसतील.

उर्वरित 6 खेळाडूंना मिळणार नाही जागा

वर्ल्डकप २०२३ मध्ये खेळलेल्या उर्वरित खेळाडूना २०२५ च्या चँपियन्स ट्रॉफीमध्ये संधी मिळणे कठीण आहे. कारण चँपियन्स ट्रॉफी २ वर्षानंतर आहे आणि बीसीसीआय संघात काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकते. त्यामुळे वर्ल्डकप २०२३ मध्ये खेळलेल्या उर्वरित खेळाडूंना संघात संधी मिळणे जवळपास अशक्य दिसते. वर्ल्डकप २०२३ मध्ये खेळलेले रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना चँपियन्स ट्रॉफी संघातून वगळले जाऊ शकते.

चँपियन्स ट्रॉफीसाठी १५ अशा प्रकारे असू शकते १५ सदस्यीय टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, शुभमन गिल, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now