वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय टीमला हरवून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन बनला आहे. मात्र फायनल जिंकल्यानंतर सेलिब्रेशनमध्ये ऑस्ट्रेलिया इतकी मग्न झाली कि त्यांच्या एका खेळाडूने असे काही केले कि ज्यामुळे तो प्रचंड ट्रोल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये बियरची बाटली घेऊन फोटो शेयर केला. सध्या या फोटोवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळालेल्या अशाच काही विचित्र सेलिब्रेशनबद्दल जाणून घेणार आहोत.


बांगलादेश क्रिकेट संघाचा खेळाडू मुश्फिकुर रहीम एक विकेटकीपर आणि बॅट्समन आहे. तो स्लोजिंगमुळे देखील खूप ओळखला जातो आणि स्टंपच्या मागे तो खूप ओरडत असतो. त्याने ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावले होते. यानंतर त्याने हेल्मेट काढले आणि तो ड्रॅगनसारखा वागू लागला. त्यामध्ये त्याने तोंड उघडे ठेवले होते, डोळे बाहेर काढले होते आणि पंजे दाखवत होता.


पाकिस्तानी खेळाडू हसन अली जेव्हा जेव्हा विकेट घेतो तेव्हा तो बॉम्बस्फोटचे सेलिब्रेशन करतो. तो विकेट घेतल्यानंतर नेहमी असे करतो. तो खाली वाकतो आणि नंतर पसरवून उघ्तो. त्यामुळे त्याला अनेकवेळा ट्रोल देखील केले गेले. जुलाई २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अलीने रायन मरेला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना त्याच्या मानेचे स्नायू ताणले गेले. त्याचे अनेक मित्र त्याच्यावर हसताना दिसले होते.


आईसीसी २०१५ विश्वचषकादरम्यान झिम्बाब्वेचा संघ हॅमिल्टन, झिम्बाब्वे येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होता. झिम्बाब्वेला एक विकेटची सक्त गरज होती आणि त्याचं क्षणी पान्यांगराने हाशिम आमलाची विकेट घेतली. पण्यांगारा इतका आनंदित झाला की तो जमिनीवर पडून आनंद साजरा करण्यासाठी चक्क रांगू लागला होता. या सेलिब्रेशनला ' द बिग माउथ बिली बैस' ' असे म्हंटले गेले.


कैस अहमदने आपल्या लेग-स्पिन गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे. तो अफगाणिस्तान राष्ट्रीय संघाकडून खेळला आहे. सीपीएल २०१८ दरम्यान तो खेळत होता. विकेट घेतल्यानंतर तो पळत सुटला आणि त्याने स्वतःला फ्लिप करत आनंद साजरा केला. यानंतर तो प्रत्येक वेळी विकेट घेतल्यानंतर असा आनंद साजरा करू लागला.


दक्षिण आफ्रिकेचा बॉलर तबरेझ शमी हा लेगस्पिनर आहे. तबरेजने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याचा अनोखा प्रकार केला. २०१८ मध्ये त्याने डेव्हिल मास्क घालून सेलिब्रेशन केले होते. आयसीसीला हे आवडले नाही. यानंतर त्यावर तात्काळ बंदी घातली गेली.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now