भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देवदूत बनून लोकांची मदत करताना पाहायला मिळाला. वास्तविक शमीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये शमी कार अपघातानात्र एका व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. शमीने सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे. शमीने लिहिले आहे कि "तो खूप भाग्यवान आहे, देवाने त्याला दुसरे आयुष्य दिले, त्याची कार माझ्यासमोर नैनितालजवळ डोंगराळ रस्त्यावरून खाली पडली. आम्ही त्याला सुखरूप बाहेर काढले आहे."

शमीने सोशल मिडियावर जो व्हिडीओ शेयर केला आहे, त्यामध्ये भारतीय गोलंदाज जखमी व्यक्तीच्या हातावर पट्टी बांधताना दिसत आहे. यावेळी अनेक लोक घटनास्थळी येतात आणि शमीसह जखमी व्यक्तीला मदत करताना दिसतात. व्हिडिओ पाहून समजू शकते की, झाडाला धडकल्यानंतर पांढऱ्या रंगाची कार तिथेच थांबली आहे.

शमीने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती आणि २३ विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. शमी विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये येऊन टीम इंडियाला प्रोत्साहन दिले होते. पंतप्रधानांनी शमीला मिठी मारली आणि त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले.

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव झाला. अंतिम फेरीत शमीला केवळ एकच विकेट घेता आली. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडने १३७ धावा करत भारताचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला असला तरी शमीने विश्वचषकात ज्याप्रकारे कामगिरी केली त्यामुळे चाहत्यांची मने जिंकली.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now