मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नसराई सुरु झाली आहे. नुकतेच अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची लग्न केले आहे. तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकर देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अशामध्ये आता अभिनेत्री पूजा सावंतने देखील चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

अभिनेत्री पूजाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून “We are engaged...” म्हणत एक फोटो शेयर केला आहे. अभिनेत्री गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेयर केला आहे. फोटोमध्ये तिच्या हातामध्ये अंगठी देखील पाहायला मिळत आहे.

फोटो शेयर करत पूजाने लिहिले आहे कि, “माझ्या आयुष्यामधील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू आहे आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, पूजाने सलग टीन इंस्टाग्राम पोस्ट शेयर केल्या आहेत.

फोटो शेयर करताना तिने नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण आहे अशी चर्चा आता रंगली आहे. पूजाने पोस्ट शेयर करताच चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now