गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील धक्कादायक घटना समोर येत आहेत. अभिनेत्री रंजुषा मेनन हि तिच्या घरामध्ये मृत अढळली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. करुथामुथू सारख्या शोमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री डॉ प्रियाचे वयाच्या ३५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ती ८ महिन्याची गरोदर होती. या घटनेने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

अभिनेत्रीच्या निधनानंतर तिला सोशल मिडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेता किशोर सत्याने एक भावनिक पोस्ट शेयर करत प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे कि, मल्याळम टेलिव्हिजन क्षेत्राला धक्का देणारा आणखी एक अनपेक्षित मृत्यू. काल तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ती ८ महिन्यांची गरोदर होती, तिचे बाळ आयसीयूमध्ये आहे, तिला आरोग्या संबंधित कोणतीच समस्या नव्हती. नेहमीप्रमाणे ती काल रुटीन चेकअप साठी गेली होती, तेव्हा तिला अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. प्रियाच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपल्या एकुलत्या एक मुलीच्या निधनानंतर तिला मोठा धक्का बसला आहे.

देव चांगल्या लोकांसोबत नेहमी क्रूर का वागतो, रंजुषाच्या निधनानंतर आणखी एक मृत्यू. जेव्हा ३५ वर्षाचा माणूस  जग सोडून जातो तेव्हा शोक देखील व्यक्त कसा करावा? हे कळत नाही. प्रियाच्या नवऱ्याला आणि आईला या संकटातून कसे बाहेर काढायचे, माहीत नाही. त्यांच्या मनाला बळ मिळो.' असं किशोरने पोस्टमध्ये लिहिले आहे. किशोर सत्याच्या पोस्टवर कमेंट करून अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रिया इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. करुथमुथू या शोमध्ये ती पाहायला मिळाली होती. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.

Post a Comment

Previous Post Next Post