काही दिवसांपासून चर्चेमध्ये असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजनेता राघव चड्ढा यांच्या लग्नाचे गुपित आता हळू हळू समोर येत आहे. लग्नाच्या अगोदर आणि नंतरचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता नुकतेच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मधून हे समोर आले आहे कि या लव्ह मॅरेजमध्ये सर्वात पहिला कोणी आई लव यू म्हंटले होते. २४ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये दोघांनी शाही पद्धतीने लग्न केले होते, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत मित्र देखील सामील झाले होते.

उदयपुरमध्ये लग्न केल्यानंतर या नवविवाहित जोडप्याने गृह प्रवेश सोहळा देखील पूर्ण केला. जेव्हा ते दिल्लीमध्ये राघव चड्ढाच्या घरी पोहोचले. अभिनेत्रीने गृहप्रवेश आणि त्यानंतरच्या धम्माल मस्तीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. जो तिच्या सासरचा आहे. व्हिडीओमध्ये चड्ढा कुटुंब आपल्या नवीन सुनेसाठी आयोजित केलेले मजेदार गेम देखील पाहू शकता. या व्हिडीओमध्ये दोघांना हा प्रश्न विचारला जातो कि सर्वात पहिला कोणी प्रपोज केले होते. इथेच कळते कि परिणीती चोप्राने पहिल्यांदा राघवला आय लव्ह यू म्हटलं होतं.

व्हिडीओमध्ये राघवच्या घराच्या प्रवेशद्वारावर दोघांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट देखील पाहू शकता. व्हिडीओमध्ये वधू बनलेली परिणीती चोप्रा गुलाबी चुडा, कपाळावर सिंदूर आणि डायमंड जडलेले मंगळसूत्र असलेला निऑन ग्रीन सूट परिधान केलेला दिसत आहे. दुसरीकडे, राघवने पांढर्याअ पँटसह तपकिरी रंगाचा कुर्ता घातला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाशी संबंधित काही छायाचित्रेही आहेत. राघव यांनी आधीच सांगितले आहे कि एका कार्यक्रमात ब्रेकफास्ट टेबलवर झालेल्या पहिल्या भेटीतून आम्हाला आमच्या मनाची स्थिती कळली होती. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. शेवटी मिस्टर अँड मिसेस झाल्याचा आनंद मिळाला!


Post a Comment

Previous Post Next Post