जवानच्या रिलीजपूर्वी शाहरुख खान आपला चित्रपट हिट व्हावा म्हणून अनेक युक्त्या अजमावत आहे. शाहरुखने नुकतेच #AskSRK सेशन केला होता. ज्यामध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पाहायला मिळाला होता. शाहरुख खान त्याच्या आगामी जवान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यस्त झाला आहे.

तर दुसरीकडे जवान चित्रपटाची अॅडवांस बुकिंग देखील जोरात सुरु आहे. यादरम्यान शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल भैयानी नावाच्या इंस्टा पेजवरून शेयर केला गेला आहे. जो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्याचबरोबर तो चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान जवान चित्रपटाची अभिनेत्री नयनतारा आणि त्याची मुलगी सुहाना खानसोबत तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यासाठी पोहोचलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही शाहरुख खानला एकदम पारंपारिक वेशामध्ये पाहू शकता. शाहरुख पांढऱ्या धोती-कुर्त्यामध्ये सुहानाचा हात धरून वेगाने चालताना दिसत आहे. तर सुहाना देखील तिच्या वडिलांप्रमाणे सलवार सूट साध्या लुकमध्ये दिसत आहे.

व्हिडीओ समोर आल्यानात्र लोक देखील यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि यामुळेच त्याला किंग खान म्हणून ओळखले जाते. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि हे फक्त किंग खानच करू शकतो. शाहरुख खानचा जवान चित्रपट ७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. ज्यामध्ये नयनतारा, विजय सेतुपति सोबत दीपिका पादुकोण देखील कॅमिओमध्ये दिसणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now