टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेमध्ये आहे. नुकतेच तिला मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केले गेले. जिथे ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत पाहायला मिळाली होती. यानंतर तिच्या वाढदिवसाच्या फोटोंमध्ये देखील तिचे बेबी बंप पाहायला मिळाले होते. तेव्हापासूनच ती प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात आहे. तथापि रुबिना आणि अभिनवने यावर कोणतीची प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहते असा अंदाज लावत होते तोच तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. एका रिपोर्टदेखील आला आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे कि ती ५ महिन्यांचा प्रेग्नंट आहे.

एका न्यूज वेबसाईटने असा देखील दावा केला आहे कि रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला पुढच्या वर्षी आपल्या पहिल्या बेबीचे स्वागत करतील. अभिनव आणि ती पुढच्या वर्षी तिच्या बेबीचे वेलकम करतील. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला रुबिनाची डिलिव्हरी होईल.

सूत्रांनी पुढे हे देखील म्हंटले कि रुबिना दिलैक मदरहुडबद्दल खूपच आनंदी आणि उत्साहित आहे. तिला या क्षणांचा आनंद एकांतामध्ये घ्यायचा आहे. यामुळे तिने दीर्घ सुट्टीसाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये एका इतर सुत्राच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे कि सध्या ती तिच्या मित्रांना देखील भेटण्यास नकार देत आहे.

यादरम्यान रुबिना दिलैकचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका फ्लाईटमधला आहे, ज्यामध्ये रुबिना आपले सामान केबिनमध्ये ठेवताना दिसत आहे. यादरम्यान तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओ वरून पुष्टी होत आहे कि रुबिना प्रेग्नंट आहे. चाहते या व्हिडीओवर कमेंट करून रुबिनाला शुभेच्छा देखील देत आहेत.

याशिवाय रिपोर्टमध्ये सूत्रांनी दावा केला आहे कि रुबिना दिलैकने प्रेग्नंटमुळे फिक्शन शो सोडला आहे. प्रेग्नंसी संबंधित आरोग्य समस्यांमुळे तिने एक शो नाकारला आहे. तिला तिच्या प्रेग्नंसीचा खूप आनंद घ्यायचा आहे. ती तिच्या पतीसोबत अमेरिकेला सुट्टीवर गेली आहे. पण रुबिना आणि अभिनव यांनी प्रेग्नंसीबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post