भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाबा झाला आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशनने एका बेबी बॉयला जन्म दिला आहे. बुमराहने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना हि गुड न्यूज दिली. तो आता नेपाळ विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये खेळू शकणार नाही.

जसप्रीत बुमराह रविवारी टीम इंडियाला सोडून मुंबईसाठी तातडीने निघाला होता. जसप्रीत बुमराह नेपाळ विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मुकणार आहे. तथापि बूम-बूम बुमराह टूर्नामेंटच्या सुपर ४ राउंडच्या अगोदर भारतीय टीममध्ये परतणार आहे. बुमराह आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.

जसप्रीत बुमराहला आपल्या पाठीच्या समस्येमुळे जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. बुमराहला पाठदुखीमुळे शस्त्रक्रिया देखील करावी लागली. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त परतणे ही भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय भूमीवर खेळल्या जाणाऱ्या मेगा स्पर्धेत बुमराह कर्णधार रोहित शर्मासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now