टीव्ही आणि फिल्म अभिनेत्री अपर्णा नायरचा मृत्यू झाला आहे. ती तिरुवनंतपुरमच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेली अढळली. ३१ ऑगस्ट रात्री ७.३० वाजता याची माहिती झाली. यादरम्यान घरामध्ये तिची आई आणि दोघी बहिणी उपस्थित होत्या. यादरम्यान कर्मणा पोलिसांनी अपर्णा नायरच्या मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे आणि पोलीस नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांकडून माहिती घेत आहेत. ती मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी इंस्टाग्रामवर सक्रीय होती.

मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरच्या अचानक मृत्यूने प्रत्येकजण हैराण आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटबद्दल बोलायचे झाले तर तिचे अकाऊंट तिच्या नवऱ्याचे आणि तिच्या मुलांच्या व्हिडीओ आणि फोटोने भरले आहे. शेवटच्या पोस्टमध्ये देखील तिने आपल्या पतीला आपली ताकद म्हंटले होते. पण त्यानंतर असे काय झाले यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अपर्णा नायरला चंदनमाझी, आत्मसखी, मैथिली विन्दुम वरुम आणि देवस्पर्शम सारख्या सिरियल्समधून चांगली ओळख मिळाली. तिने सिल्वर स्क्रीनवर देखील नशीब आजमावले. ती निवेद्यममध्ये पाहायला मिळाली होती आणि लोहितदासने तिला इंट्रोड्युस केले होते. याशिवाय मल्लू सिंह आणि थट्टाथिन मरायथु आणि जोशीज रन बेबी रन सारख्या चित्रपटांचा देखील ती भाग राहिली आहे.

अपर्णा नायर ३१ वर्षाची होती. ती तिच्या घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत अढळली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या कुटुंबामध्ये पती संजीत, आणि दोन मुली कृतिका आणि तराया आहेत. मृत्यूच्या काही मिनिटांअगोदर तिने तिच्या मुलीचा एक क्युट व्हिडीओ शेयर केला होता. याशिवाय तिने व्हिडीओचा एक कोलाज देखील शेयर केला होता. ज्याला तिने स्वतः आवाज दिला होता. ती सांगत होती कि महिला त्यांच्या लाईफमध्ये किती कठीण परिस्थितीमधून जावे लागते.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now