एकेकाळी बॉलीवूडमध्ये राज्य करणारा अभिनेता अर्जुन रामपाल सध्या चित्रपटांमध्ये जास्त पाहायला मिळत नाही. सुरवातीच्या काळामध्ये अर्जुन त्याच्या अभिनयामुळे खूपच प्रसिद्ध झाला होता, पण हळू हळू त्याची प्रसिद्धी कमी होती गेली.

सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अर्जुन रामपाल खूपच कमी पाहायला मिळतो. पण आजदेखील तो आपल्या स्टाईल आणि लुकमुळे खूप चर्चेमध्ये राहतो. अनेक वेळा फिटनेसमुळे चर्चेमध्ये असणारा अर्जुन रामपाल सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेमध्ये आहे.

अभिनेता अर्जुन रामपाल सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव असतो आणि चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटो तो नेहमी शेयर करत असतो. नुकताच त्याने आपल्या लेकीसोबतचा एक फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून शेयर केला आहे.

हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्याच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. अर्जुनच्या थोरल्या मुलीचे नाव मायरा असून ती सोशल मिडियावर फारशी सक्रीय नसते. पण अर्जुन तिचे फोटो शेयर करत असतो.

मायरा अर्जुनच्या पहिल्या पत्नीची मुलगी असून तो सध्या गॅब्रिएला हिला डेट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मायरा सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेमध्ये आलेली पाहायला मिळत आहे. ती इतर स्टारकिडवर चांगलीच भारी पडली आहे. मायराने नुकतेच तिचे इंस्ताग्राम अकाऊंट पब्लिक केले असून हळू हळू तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post