बिग बॉस १३ मधील स्पर्धक अभिनेत्री शहनाज गिल सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. सोशल मिडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर करत असते.

नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगला व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज तोंड लपवताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये शहनाजने हुडी घातलेली पाहायला मिळत आहे.

विमानतळावर जेव्हा शहनाज बाहेर आली तेव्हा तिला कॅमेरामनने घेरले अशामध्ये तिने आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर ती धावत पुढे निघून गेली. या व्हिडीओमुळे सोशल मिडियावर अनेक अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

बिग बॉस १३ ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री शहनाज गिल कभी ईद कभी दिवाळी या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता आणि गायक जस्सी गिलसोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे.

शहनाज बिग बॉस १३ मधून लोकप्रिय झाली होती. त्याचबरोबर सिद्धार्थ शुक्लासोबतच्या रिलेशनशिपमुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती. मात्र गेल्या वर्षी सिद्धार्थचा मृत्यू झाल्यामुळे शहनाजला मोठा धक्का बसला होता. ज्यामधून ती आता हळू हळू सावरत आहे. गेल्या वर्षी ती दिलजित दोसांझसोबत पंजाबी चित्रपट हौंसलामध्ये पाहायला मिळाली होती.

पहा व्हिडीओ:-


Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now