बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक पॅचअप-ब्रेकअप ऐकायला आणि पाहायला मिळत असतात. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री हरलीन सेठी यांच्या ब्रेकअपनंतर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण विकी कौशलने नंतर कॅटरीनासोबत लग्न करून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.

तर दुसरीकडे विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपनंतर हरलीननेही आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री हरलीन सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असते. सोशल मिडियावर ती नेहमी आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत राहते.

.

नुकतेच अभिनेत्री हरलीनने एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे ज्यामध्ये तिने आपला एक्स बॉयफ्रेंड विक्की कौशलवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. फोटो शेयर करताना हरलीनने कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या बॉयफ्रेंडच्या तुलनेत रस्ता खूपच खोल आहे.'


हरलीनने सोशल मिडियावर शेयर केलेली हि पोस्ट सध्या खूपच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा सल्ला दिला आहे. हरलीनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर गोविंदा नाम मेरा, सॅम बहादुर, द इम्मॉर्टल अश्वत्थामा आणि लुका छुपी २ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post