सध्या मराठीमध्ये भव्य असे ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळत आहे. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक म्हणजे पावनखिंड चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.

अजय पुरकर यांनी साकारलेल्या या भूमिकेला दर्शकांची चांगलीच दाद मिळाली. त्यांच्या भूमिकेचे खूपच कौतुक करण्यात आले. म्हणूनच कि काय त्यांनी चक्क ज्या पावन भूमीमध्ये पावनखिंडची लढाई झाली तिथे आपले घर बांधले आहे.


असे काम फक्त एक इतिहास वेडाच करू शकतो. अभिनेते अजय पुरकर यांनी वीर बाजीप्रभू यांची भूमिका अक्षरशः जगली असे म्हणायला काही हरकत नाही. या भूमिकेने त्यांना खूप प्रेम दिले. ज्या मातीमध्ये असा इतिहास घडला वीर बाजीप्रभूंनी आपल्या प्राणाची बाजी लावली त्याच मातीमध्ये आपले एक घर असावे अशी अजय यांची इच्छा होती.

.

ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरले आहे. त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याला आपले स्वप्नातले घर बांधले आहे. अजय यांच्या नव्या घराचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या अजून त्यांच्या घराचे काम सुरु आहे. फोटोमध्ये आपल्याला छान सुंदर घर पाहायला मिळत आहे.

घराच्या बाहेरच्या बाजूला लाल आणि राखाडी रंग देण्यात आला आहे. घराची रचना अगदी लक्ष वेधून घेणारी आहे. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनेची शौर्यगाथा पावनखिंड चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आता येत्या १९ तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now