आई आणि मुलाच्या नात्यापेक्षा कोणतेच नाते जगामध्ये मोठे नसते. खास गोष्ट हि आहे कि आईची कमी कोणीच भरून काढू शकत नाही. या नात्याबद्दल जे काही बोलले जाईल तितके ते कमीच आहे. कारण देवाने आईला बनवलेच तसे आहे.

आईची जागा घेणे आणि तिची बराबरी करणे अशक्य आहे. आई आणि मुलाच्या या नात्याचा भावुक करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक जेव्हा आई मुलापासून दूर होते तेव्हा तिची कमी मुलगा गाणे म्हणून व्यक्त करतो.

मुलाचे हे गाणे ज्याने ऐकले तो भावुक होतो. आईपासून दूर राहण्याच्या वेदना शब्दामध्ये वर्णन करता येणार नाहीत. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या आईला आठवत असे गाणे म्हणत आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही देखील इमोशनल व्हाल.

व्हायरल होत असेलल्या या व्हिडीओला पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आपसूकच पाणी येईल. व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या आईला आठवत आहे. मनाला चटका देऊन जाणारे गाणे म्हणत भावुक झाला आहे. भोजपुरी स्टार खेसारी लालचे ‘माई बिना जिंदगी अधूरा’ हे गाणे तो लहान मुलगा म्हणत आहे.

तुम्ही पाहू शकता कि मुलगा लाकडाच्या खाटावर बसला आहे. यानंतर तो आपल्या आईला आठवतो आणि गाणे म्हणू लागतो. गाणे म्हणता म्हणता मुलाच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू येऊ लागतात. त्याच्या आवाजामध्ये त्याचे आईपासून वेगळे होण्याचे दुख आपल्याला जाणवू शकते. हा व्हिडीओ बनारसी बीट्स नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून शेयर केले गेला आहे. व्हिडीओ शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे मुलांनो हे गाणे तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now