सोशल मिडियावर आपल्याला हर तर्हेचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये अनेक व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर अनेक व्हिडीओ हे हृदय जिंकणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी देखील आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओमध्ये एका सरकारी शाळेमधील शिक्षिका आणि विद्यार्थीनी चक्क डांस करताना पाहायला मिळत आहेत. शाळेच्या दिवसांमध्ये आपण खूप धम्माल मस्ती केली असेल, कधी कधी आपण शिक्षकांना नाव देखील ठेवत होतो.

.

पण आता काळ बदलला आहे. शिक्षक आणि मुलांची आता खूपच जवळीक झाली आहे. ज्यामुळे अनेक शिक्षक असे असतात जे मुलांचे खूप फेवरेट बनतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये या शिक्षिका देखील सर्वांच्या आवडत्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्यल्या या शिक्षिकेचे नाव मनू गुलाटी असून त्या दिल्लीमधील सरकारी शाळेमध्ये शिकवतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या नेहमी नवनवीन पद्धती वापरत असतात. कधी त्या विद्यार्थ्यांना हस्तकलेमधून शिकवत असतात तर कधी डांसमधून. ज्यामुळे विद्यार्थ्यांना कंटाळा देखील येत नाही.

.

या व्हिडीओमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत झुमका बरेली वाला गाण्यावर सुंदर डांस करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थी देखील गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ मनू गुलाटी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेयर केला आहे.

ट्विटरवर शेयर केलेला हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट आल्या आहेत. ३.५६ लाखापेक्षा जास्त लोकांनी याला पाहिले आहेत तर १८ हजार पेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केले आहे.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post