साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता पुष्पा फेम अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पाच्या चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. सोशल मिडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना सध्या पाहायला मिळत आहेत. नुकतेच अल्लू अर्जुन मुंबईमध्ये दिसला होता.

यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील सोबत होते. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन ज्या पद्धतीने वागला आहे ते लोकांना मुळीच आवडलेलं नाही.

अल्लू अर्जुनच्या व्हिडीओवर त्याचे चाहते राग व्यक्ती करताना पाहायला मिळत आहेत. डोक्यावर गोल टोपी, डोळ्यावर गॉगल यामध्ये अल्लू अर्जुनचा लुक पाहण्यासारखा होता. मुंबईमध्ये स्पॉट झालेल्या अल्लू अर्जुनचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर उत्सुक होते त्याचबरोबर काही चाहते देखील त्याला भेटण्यासाठी आतुर झाले होते.

अल्लू अर्जुनने दोन मिनिटे देखील वेळ त्यांच्यासाठी दिला नाही. त्याने साधे पोज देणे तर दूर साधे आपल्या चाहत्यांकडे पाहिले देखील नाही. अल्लू अर्जुन ज्याप्रकारे वागलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे ते पाहता लोकांना ते मुळीच आवडलेलं नाही.

अभिनेता अल्लू अर्जुनची एक विनम्र आणि दयाळू अशी इमेज आहे. असे असताना त्याचे हे वागणे पाहून त्याच्यावर सोशल मिडियाद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांना तर असे देखील म्हंटले आहे कि तुला कोणत्या गोष्टीचा इतका गर्व आला आहे ?

अल्लू अर्जुनच्या प्रोफेशन लाईफबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच तो पुष्पा: द राइज चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. १७ डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तेलगुसोबत मल्याळम, हिंदी, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. लवकरच अल्लू अर्जुनचा पुष्पा : द रुल चित्रपट दर्शकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटींग ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post