नवरात्र हा दुर्गा मातेचा उत्सव मानला जातो. वसंत आणि शरद ऋतूची सुरुवात व जलवायू आणि सूर्यचा महत्वपूर्ण संगम मानला जातो. हे दोन्ही काळ दुर्गा मातेच्या पूजेचे पवित्र प्रसंग मानले जातात. नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांचे पूजन केले जाते.

दरवर्षी हा पवित्र उत्सव श्रावण संपताच सुरू होतो. परंतु यावेळी अधिक मासामुळे हे शक्य झाले नाही. या वेळी नवरात्रोत्सव शनिवार १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि २५ ऑक्टोबरपर्यंत असेल. चला तर मग जाणून घेऊया शारदीय नवरात्रोत्सव मागील पौराणिक कथा काय आहे व त्याचे महत्व काय आहे.

दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांचे पूजन केले जाते

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी माता शैलपुत्री, दुसर्याे दिवशी माता ब्रह्मचारिणी, तिसर्याह दिवशी माता चंद्रघंटा, चौथ्या दिवशी माता कुष्मांडा, पाचव्या दिवशी माता कात्यायनी, सहाव्या दिवशी माता कालरात्री, आठव्या दिवशी माता महागौरी आणि नवव्या आणि शेवटच्या दिवशी माता सिद्धिदात्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धर्मग्रंथानुसार घटस्थापनेचा नियम आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाची आख्यायिका

शास्त्रात नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या आख्यायिकेनुसार महिषासुर नावाचा एक राक्षस होता जो ब्रह्माजींचा एक महान भक्त होता. त्याने आपल्या तपस्यामुळे ब्रम्हाजीना प्रसन्न केले आणि वरदान प्राप्त केले. त्याने असा वर प्राप्त केला की, कोणतेही देव, राक्षस किंवा पृथ्वीवर राहणारा कोणताही मनुष्य त्याला मारू शकत नाही.

पण वरदान मिळाल्यावर तो अत्यंत क्रूर झाला आणि जगातील तिन्ही लोकांत तो दहशत माजवू लागला. त्याच्या दहशतीमुळे त्रस्त होऊन देवी-देवतांनी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गा मातेला मातृशक्ती म्हणून जन्म दिला. दुर्गा मातेचे आणि महिषासुराचे नऊ दिवस जोरदार युद्ध चालू होते आणि दहाव्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुरचा वध केला. तेव्हा पासून हा दिवस क्रूर आणि वाईटपणावर एक विजय म्हणून साजरा केला जातो.

मर्यादा पुरुषोत्तम यांनी केली होती दुर्गा मातेची उपासना

दुसर्या पौराणिक कथेनुसार भगवान श्री रामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि रावणाबरोबर युद्ध जिंकण्यापूर्वी देवी दुर्गामातेची आराधना केली होती. रामेश्वरममध्ये त्यांनी नऊ दिवस मनोभावे दुर्गा मातेची पूजा केली.

त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या दुर्गा मातेने श्री रामाला लंकेमध्ये विजय मिळो असा आशीर्वाद दिला आणि दहाव्या दिवशी श्री रामांनी लढाईत लंका राजा रावणाचा पराभव केला आणि त्याचा वध केला व लंका जिंकली आणि हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जाऊ लागला.

Post a Comment

Previous Post Next Post