भोजपुरी गाणी तथा चित्रपट पाहणारे बहुतेक लोक मोनालिसाला ओळखत नाहीत आसे कधी होणार नाही. मोनालिसा त्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे, जी सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव राहत असते. १०० पेक्षा जास्त भोजपुरी, हिंदी, बंगाली तथा अन्य भाषांच्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. तिचे लहानपण आर्थिक संकटामध्येच व्यतीत झाले. तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि तिच्या वडिलांना बिजनेसमध्ये खूपच नुकसान झाले होते. ज्यामुळे घरची परिस्थिती खूपच हलाखीची झाली होती. मोनालिसाने १५ व्या वर्षापासून काम करायला सुरु केले होते. चला तर तिच्या आयुष्यासंबंधी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.


दिवसभर काम करण्याचे मिळत होते १२० रुपये

आपल्या संघर्षाच्या दिवसांना आठवताना मोनालिसाने सांगितले होते कि अभिनयाच्या जगतामध्ये येण्यापूर्वी ती हॉटेलमध्ये नोकरी करत होती. पैसे कमवण्यासाठी तिने हॉस्टेसचे काम केले. जिथे सॅलरीच्या स्वरुपात दररोज १२० रुपये मिळत होते. तिने वेग-वेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये काम करून तीन वर्षे घर चालवले होते. एका बंगाली प्रोड्युसरसोबत भेट झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. वास्तविक त्याच प्रोड्युसरने तिला मॉडेलिंगचा सल्ला दिला होता. ज्यानंतर मोनालिसाने कधी मागे वळून पाहिले नाही.


नाव बदलले

बंगाली हिंदू परिवारामध्ये जन्मलेल्या मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. मॉडेलिंगमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर तिने काही म्युझिक व्हिडिओ अल्बममध्ये काम केले. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अंकलच्या सल्ल्याने तिने आपले नाव बदलून मोनालिसा ठेवले. तथापि जास्तकरून लोक तिला याच नावाने ओळखतात. बिग बॉस सीजन दहामध्ये मोनालिसाने देखील हिस्सा घेतला होता. आपला कथित प्रेमी तथा भोजपुरी अभिनेता विक्रांत सिंहसोबत तिने याच शोमध्ये लग्न केले. यानंतर डांस रियालिटी शो नच बलियेमध्ये देखील दोघे दिसले.


एका चित्रपटाची इतकी फीस

बिग बॉसमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर मोनालिसा छोट्या पडद्यावरील सिरीयलच्या एका एपिसोडसाठी जवळ जवळ ५० हजार रुपये चार्ज करते. तर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर मोनालिसा एका चित्रपटासाठी पाच ते सात लाख रुपये घेते. एका लीडिंग वेबसाईटनुसार मोनालिसाची एकूण संपत्ती जवळ जवळ ८ करोड रुपये इतकी आहे.


मुंबईमध्ये खरेदी केला फ्लॅट

मोनालिसा मुंबईमध्ये आपल्या पतीसोबत स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहते. जो तिने २०१४ मध्ये खरेदी केला होता. याआधी जवळ जवळ दहा वर्षे ती रेंटच्या फ्लॅटमध्ये राहत होती. २ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहणारी मोनालिसा म्हणते कि मुंबईमध्ये घर खरेदी करणे तिच्यासाठी एक स्वप्नासारखे आहे. यासोबतच तिने गेल्या वर्षी आपल्यासाठी ऑडी कार देखील खरेदी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now